निमोणे – शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी गावातील आबा धावडे यांची भाजपच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद तसेच शिरुर बेट मंडळचे अध्यक्ष राहुल पाचर्णे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आबा धावडे हे गेल्या २० वर्षांपासुन लोकनेते माजी आमदार स्वर्गीय बाबुराव पाचर्णे तसेच भाजपाचे कट्टर समर्थक आहेत. स्व बाबुराव पाचर्णे यांच्यानंतर त्यांचे पुत्र राहुल पाचर्णे यांच्यासोबत सध्या धावडे हे काम करत आहेत. ‘भारतीय जनता पार्टी’ ने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जो विश्वास टाकला आहे. त्यासाठी मी पक्षातील पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. तसेच पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी यापुढे प्रयत्न करणार असल्याचे आबा धावडे यांनी सांगितले.