औरंगाबाद: राज्यातील गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून मुंबई पुण्यात मानाचे गणपती विसर्जनासाठी बाहेर पडले आहेत. पुण्यातही मनाच्या गणपती विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, औरंगाबादमध्येही आता विसर्जन मिरवणूकीची तयारी सुरु आहे.
शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती मंदिरात शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते आरती करण्यात येत आहे. त्यामुळे थोड्याच वेळात मिरवणूक निघणार आहे.