नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे नेते आणि सध्या तुरूंगात असूनही मंत्रिपदावर कायम असलेले नेते सत्येंद्र जैन यांना तुरूंगात विविध सुविधा मिळत असल्याचा व्हिडिओ प्रसिध्द झाला आहे.
The masseur providing massage to jailed Delhi min Satyendar Jain is a prisoner Rinku. He’s a prisoner in a rape case, charged u/s 6 of POCSO Act & 376, 506 & 509 of IPC. He’s not a physiotherapist: Tihar Jail official sources
(Pic-screengrab from CCTV visuals of massage to Jain) pic.twitter.com/aXtLNtgFIB
— ANI (@ANI) November 22, 2022
एका व्हिडिओत तर त्यांची तुरूंगात मालिश केली जात असल्याचेही दिसून आले आहे. त्यावरून एकेकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटचे सहकारी आणि आता भारतीय जनता पार्टीचे नेते कपिल मिश्रा यांनी सोशल मीडियावर याबाबत टिप्पणी करणारा एक व्हिडीओ जारी केला आहे.
दिल्ली वालों की माँग सुन लो : जो सेवा सत्येन्दर जैन की हो रही हैं , वैसी ही मालिश तिहाड़ में केजरीवाल और मनीष सिसोदिया की भी हो , दिल्ली को लूट लूट के बहुत थक गए होंगे दोनों watch : pic.twitter.com/QLtwSh80rN
— Kapil Mishra (@KapilMishra_IND) November 20, 2022
त्यात केजरीवाल आणि सिसोदिया (दिल्लीचे उपमुख्यमंत्री) यांचीही मालिश केली पाहिजे असे म्हटले आहे. दिल्लीकरांचे ऐका, तिहारमध्ये जशी मालिश जैन यांची होते आहे तशीच ती केजरीवाल आणि सिसोदिया यांचीही व्हावी असे मिश्रा त्यात बोलताना दिसत आहेत.
दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग दर्जा देण्याच्या कामाला गती द्यावी – उपमुख्यमंत्री फडणवीस
दरम्यान, त्यांच्या या विधानावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही दिल्लीकरांनी त्यांचे समर्थन केले आहे, तर काहींनी त्यांना विरोध दर्शवला आहे.