पंजाब सरकार उलथवून टाकण्याचे ‘आप’चे आरोप खोटे, माहिती उघड करण्याचे भाजपचे आव्हान
Updated On:

चंडिगढ – पंजाब सरकार पाडण्याच्या प्रयत्नांविषयी आपने केलेले आरोप खोटे आणि निराधार आहेत, अशी प्रतिक्रिया त्या राज्यातील भाजपच्या नेत्यांनी दिली. पंजाबमधील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात आप सरकारला सपशेल अपयश आले आहे.
त्यामुळे जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आपकडून खोट्या आरोपांचा आधार घेतला जात आहे, अशी टीका भाजपचे नेते जीवन गुप्ता यांनी केली. तर, कुणी संपर्क साधला त्याविषयीची माहिती आपने उघड करावी. चीमा यांनी आपच्या आमदारांशी संपर्क साधणाऱ्यांचे फोन नंबर जाहीर करावेत. अन्यथा, मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असे आव्हान भाजपचे आणखी एक नेते अनिल सरीन यांनी दिले.





