Aamir Khan | बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. 2021मध्ये आमिर आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव यांनी विभक्त होत घटस्फोट घेतला. त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला होता. त्यानंतर आता आमिर खान तिसऱ्यांदा विवाह करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावर स्वत: आमिर खानने खुलासा केला आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये आमिर खानने हजेरी लावली होती. त्यादरम्यान लग्नाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमिर खान म्हणाला की, “मला वाटत नाही की मी आता पुन्हा लग्न करू शकेन. मी आता ५९ वर्षांचा आहे. सध्या माझ्या आयुष्यात अनेक नाती आहेत. मी पुन्हा माझ्या कुटुंबीयांसोबत जोडलो गेलो आहे. मला मुलं आहेत. भाऊ-बहीण आहेत. मी माझ्या जवळच्या लोकांबरोबर आनंदी आहे. मी एक चांगला माणूस होण्याच्या दृष्टीने काम करत आहे”. आमिर खानचा पहिला विवाह 18 एप्रिल 1986 रोजी रीना दत्तासोबत झाला होता. त्यांना जुनैद नावाचा मुलगा आणि इरा नावाची मुलगी आहे. 2002 मध्ये आमिर आणि रीना विभक्त झाले. यानंतर आमिर खानने किरण रावशी लग्न केले आणि तिच्यापासून आमिरला आझाद नावाचा मुलगा आहे. नुकतेच इराच्या लग्नात आमिरसह किरणने देखील हजेरी लावली होती. सध्या आमिर त्याच्या आगामी ‘सितारे जमीन पर’ सिनेमामुळे चर्चेत आहे. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तारे जमीन पर’ या सिनेमाचा हा सीक्वल असणार आहे. या सिनेमात अभिनेत्री जिनिलीया देशमुख मुख्य भूमिकेत असणार आहे. हेही वाचा: “डिअर अहो, बाय, यू आर फ्री बर्ड नाऊ…!” ; पतीच्या छळाला कंटाळून डॉक्टर पत्नीची आत्महत्या ; ७ पानांच्या चिठ्ठीतून सांगितली छळाची आपबिती