आमिर खानने ‘दंगल’ चित्रपटात केली होती एक चूक; केवळ अमिताभ बच्चन यांनाच समजली

Amir Khan | बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा ‘दंगल’ चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. मात्र ‘दंगल’ चित्रपटात एक छोटीशी चूक झाली होती, जी केवळ अमिताभ बच्चन यांच्या लक्षात आली होती. सहसा प्रेक्षकांच्या नजरेतून कोणतीही चूक सुटत नाही. पण, ‘दंगल’ चित्रपटात आमिर खानकडून झालेली मोठी चूक प्रेक्षकांच्याही लक्षात आली नाही. याबद्दल स्वत: आमिरने खुलासा केला आहे.
मुंबईतील रेड लॉरी फिल्म फेस्टिव्हलमध्ये आमिर खान ‘दंगल’ चित्रपटाबद्दल म्हणाला की, “‘दंगल’ हा मी सर्वोत्तम अभिनय दिलेला चित्रपट आहे. पण चित्रपटातील एका शॉटमध्ये मी चूक केली होती आणि अमिताभ बच्चन इतके हुशार आहेत की त्यांनी ती चूक पकडली.
आमिरनं जेव्हा विचारलं की कोणता शॉट तर आमिताभ यांनी सांगितलं की, ‘कुस्तीच्या एका शॉटमध्ये तु ‘येस’ म्हणाला होता’. यातील आमिरची जी महावीर फोगटची भूमिका होती, ती ‘येस’ बोलू शकत नव्हती. त्या भूमिकेनं वाह किंवा शाब्बास सारखं काही बोलायला हवं होतं. ‘येस’ ही इंग्रजी किंवा मुंबईची भाषा आहे. तो एकच शॉट एडिटमध्ये राहिला आणि मला पण त्याविषयी नंतर जाणवलं,” असा खुलासा यावेळी आमिरने केला.
दरम्यान, आमिर खानचा ‘दंगल’ हा चित्रपट केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर भारतीय चित्रपटसृष्टीतही सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 2 हजार कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती.
हेही वाचा:





