Aamir Khan : आमीर खानने नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख करून दिली; नात्याबाबत केला ‘हा’ मोठा खुलासा

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेल्या आमिर खानचा १४ मार्च रोजी ६० वा वाढदिवस आहे. मात्र त्याअगोदरच त्याने मीडिया आणि पापाराझींसोबत वाढदिवसाचा आनंद साजरा केला. विशेष म्हणजे, यावेळी आमिर खानने त्याच्या नव्या गर्लफ्रेंडची ओळख मीडियाला करून दिली. गौरी असे तिचे नाव असून ती मूळची बंगळुरूची आहे. यावेळी आमिर खानने त्यांच्या नात्याबाबत देखील खुलासा केला.
काय म्हणाले आमिर खान?
“मी गौरीला गेल्या पंचवीस वर्षांपासून ओळखतो. मात्र, गेल्या अडीच वर्षांपासून आम्ही दोघे एकत्र आहोत.” यावेळी पत्रकारांनी त्याला ‘तू गौरीसोबत लग्न करणार का?’ असे विचारले असता आमिरने थोड्या विनोदी शैलीत उत्तर दिले. तो म्हणाला, “वयाच्या साठाव्या वर्षी लग्न करणं सूट होत नाही. आम्ही दोघे सोबत आहोत आणि खुश आहोत. लग्नाचा विचार पुढे करू.”
गौरी कोण आहे?
आमिर खानची नवी गर्लफ्रेंड गौरी ही मूळची बंगळुरूची असून ती गेल्या अनेक वर्षांपासून आमिरच्या ओळखीची आहे. मात्र, गेल्या अडीच वर्षांपासून ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे आमिरने स्पष्ट केले. “गेल्या पंचवीस वर्षांपासून मी गौरीला ओळखतो, पण अडीच वर्षांपासून आम्ही एकत्र आहोत,” असे आमिर म्हणाला आहे.
आमिर खानचे वैवाहिक आयुष्य?
आमिर खानने याआधी दोन वेळा विवाह केला आहे. १९८६ मध्ये त्याने पहिल्या पत्नी रीना दत्त हिच्याशी लग्न केले होते. मात्र, २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २००५ मध्ये त्याने किरण रावशी दुसरे लग्न केले, परंतु २०२१ मध्ये त्यांचेही लग्न संपुष्टात आले. आता गौरीसोबतच्या नात्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.





