Aadhaar Card Status: सरकारने 2 कोटी ‘आधार’ कार्ड का केले निष्क्रिय; तुमचं कार्ड ॲक्टिव्ह आहे का? एका मिनिटात असं तपासा

Aadhaar Card Status: केंद्र सरकारने आधार डेटाबेस स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी २ कोटींहून अधिक आधार क्रमांक (Aadhaar Number) निष्क्रिय (Deactivate) केले आहेत. अशा परिस्थितीत, आपले आधार कार्ड चालू (Active) आहे की नाही, हे घरबसल्या अगदी सहज तपासता येते.
आजकाल प्रत्येक सरकारी कामात आधार क्रमांक हा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून वापरला जातो. अशा परिस्थितीत, आपले आधार कार्ड चुकून निष्क्रिय झाले तर अनेक आवश्यक कामे थांबण्याची शक्यता असते. सरकारने एक मोठे पाऊल उचलले असून देशातील २ कोटींहून अधिक आधार क्रमांक निष्क्रिय केले आहेत. आधार प्रणाली स्वच्छ, सुरक्षित आणि अद्ययावत ठेवणे हा यामागचा उद्देश आहे.
इतके आधार क्रमांक का केले निष्क्रिय?
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या या मोठ्या ‘क्लीन-अप’ मोहिमेचा हा भाग आहे. ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यांचे आधार क्रमांक आता बंद करण्यात आले आहेत, जेणेकरून त्यांचा गैरवापर होऊ नये, असे सरकारचे म्हणणे आहे.
मंत्रालयाच्या माहितीनुसार, मृत व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी UIDAI ने रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (RGI), राज्य सरकारे, सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS), राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम (NSAP) यांसारख्या अनेक एजन्सीच्या सहकार्याने डेटा गोळा केला आहे. आता UIDAI बँका आणि विमा कंपन्यांकडूनही डेटा घेण्याची तयारी करत आहे, जेणेकरून मृत व्यक्तींची माहिती लवकर मिळू शकेल आणि डेटाबेस स्वच्छ ठेवता येईल.
UIDAI has deactivated more than 2 crore Aadhaar numbers of deceased individuals as part of a nationwide effort to maintain the continued accuracy of the Aadhaar database.
UIDAI has sourced deceased persons data from Registrar General of India (RGI), States/UTs, Public… pic.twitter.com/IOb0b9JBMY
— Aadhaar (@UIDAI) November 26, 2025
तुमचे आधार कार्ड ॲक्टिव्ह आहे की नाही, असे तपासा –
1. UIDAI च्या ‘ईमेल/मोबाईल तपासा’ सेवेद्वारे
-वेबसाइट उघडा: myaadhaar.uidai.gov.in/verify-email-mobile
-आधार क्रमांक (Aadhaar Number) आणि तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी भरा.
-कॅप्चा (Captcha) टाकून “Submit OTP” वर क्लिक करा.
-जर तुम्हाला लगेच OTP मिळाला, तर तुमचे आधार ॲक्टिव्ह आहे.
-जर OTP आला नाही किंवा “Aadhaar is deactivated” असे दिसले, तर तुमचे आधार बंद आहे.
2. mAadhaar ॲपद्वारे तपासा –
-mAadhaar ॲप डाउनलोड करा.
-आधार क्रमांक आणि OTP वापरून लॉगिन करा.
-जर तुमची प्रोफाइल उघडली, तर आधार ॲक्टिव्ह आहे.
-जर लॉगिन झाले नाही, तर आधार निष्क्रिय होण्याची शक्यता आहे.
3. Resident UIDAI पोर्टलद्वारे तपासा –
-पोर्टल उघडा: resident.uidai.gov.in/check-aadhaar-status
-आधार क्रमांक आणि कॅप्चा (Captcha) टाका.
-“Check Status” वर क्लिक करा.
येथे तुम्हाला स्पष्टपणे Active (सक्रिय) किंवा Deactivated (निष्क्रिय) असे लिहिलेले दिसेल.
4. टोल-फ्री क्रमांकावर कॉल करा:
– टोल-फ्री क्रमांक 1947 वर कॉल करा.
– संबंधित भाषा निवडा.
-तुम्ही तुमचा आधार क्रमांक सांगितल्यावर कस्टमर केअर प्रतिनिधी तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा स्टेटस (Status) सांगेल.
आजकाल प्रत्येक छोट्या-मोठ्या कामासाठी आधार कार्ड आवश्यक आहे, त्यामुळे तुम्ही एकदा तुमचा स्टेटस तपासून निश्चिंत व्हा.





