धनकवडी, दि. 18 (प्रतिनिधी) -मतदार यादी अद्ययावत होण्यासाठी मतदार ओळख पत्रासोबत आधार कार्ड लिंक करण्यासाठी व जोडण्याचे शिबिर धनकवडी परिसरात घेण्यात आले. निवडणुकांच्या वेळी मतदार यादीमध्ये दुबार मतदार नोंदणीचा घोळ होणार नाही. तसेच, निवडणुकीवेळी त्रास कमी व्हावा, याकरिता स्वयंस्फुर्तीने नागरिकांनी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले होते,
त्यानुसार मतदार याद्यांच्या प्रमाणीकरणासाठी दुबार नावे वगळण्यासाठी आधार कार्ड माहितीला दुहेरी सुरक्षितता मिळणार असल्याने नागरिकांनी शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. धनकवडीतील सोसायट्यांमध्ये शिबिरांतही नागरिक मोठ्या प्रमाणात आधार कार्ड लिंक करण्यासाठी गर्दी करीत आहेत.