Aadhaar Name and Address Update: आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. सरकारी कामकाज, बँक खाते उघडणे, योजनांचा लाभ घेणे यासारख्या अनेक प्रक्रियांमध्ये आधार कार्ड आवश्यक ठरते. लग्नानंतर अनेकांना आधार कार्डात नाव आणि पत्ता बदलण्याची गरज भासते. ही प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धती उपलब्ध करून दिल्या आहेत. लग्नानंतर आधार कार्डात नाव कसे बदलावे? लग्नानंतर आधार कार्डात नाव बदलण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा: ऑफलाइन प्रक्रिया: आधार केंद्राला भेट द्या: आपल्या जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जा. तिथे आधार अपडेट फॉर्म भरा. या फॉर्ममध्ये तुमचे 12 अंकीय आधार क्रमांक, नवीन पूर्ण नाव आणि विवाह प्रमाणपत्र (मॅरेज सर्टिफिकेट) जमा करा. पतीच्या आधार कार्डाची कॉपी: तुमच्या विवाह प्रमाणपत्रात तुमच्या जोडीदाराचे असलेले नाव आधार कार्ड लिंकिंग फॉर्म भरून जोडीदाराच्या आधार कार्डाची कॉपी जमा करा. शुल्क: नाव बदलण्यासाठी 50 रुपये शुल्क आकारले जाते. URN क्रमांक: यशस्वी सत्यापनानंतर तुम्हाला एक ॲक्नॉलेजमेंट स्लिप मिळेल, ज्यावर युनिक अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) नमूद असेल. या नंबरद्वारे तुम्ही अपडेटचा स्टेटस ट्रॅक करू शकता. प्रक्रियेचा कालावधी: साधारणतः 90 दिवसांत तुमचे नवीन नाव आधार कार्डात अपडेट होईल. ऑनलाइन प्रक्रिया: UIDAI वेबसाइटला भेट द्या: UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा. डेमोग्राफिक डेटा अपडेट: “My Aadhaar” सेक्शनमधील “Update Demographics Data” पर्यायावर क्लिक करा. आधार क्रमांक टाका: तुमचा 12 अंकीय आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका. नाव अपडेट: “Name” हा पर्याय निवडा आणि नवीन नाव प्रविष्ट करा. दस्तऐवज अपलोड: विवाह प्रमाणपत्र आणि जोडीदाराच्या आधार कार्डाची स्कॅन केलेली कॉपी अपलोड करा. शुल्क: नाव अपडेटसाठी 50 रुपये शुल्क ऑनलाइन भरावे लागेल. पडताळणी: सर्व तपशील अपडेट केल्यानंतर तुम्हाला ते पाहता येतील. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमचे नवीन नाव आधार कार्डात समाविष्ट होईल. लग्नानंतर आधार कार्डात पत्ता कसा बदलावा? लग्नानंतर नवीन घरी स्थलांतर केल्यास आधार कार्डात पत्ता अपडेट करणे आवश्यक आहे. यासाठी खालील प्रक्रियेचा अवलंब करा: ऑफलाइन प्रक्रिया: आधार केंद्रावर फॉर्म भरा: जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जा आणि आधार अपडेट फॉर्ममध्ये नवीन पत्ता भरा. पत्त्याचा पुरावा: पत्त्याचा पुरावा म्हणून भाडे करार (रेंट ॲग्रीमेंट), तुमच्या नावावरील वीज/पाणी बिल किंवा इतर वैध दस्तऐवज सादर करा. आवश्यक दस्तऐवज: पत्त्याच्या अपडेटसाठी विवाह प्रमाणपत्र आणि जोडीदाराच्या आधार कार्डाची कॉपी आवश्यक आहे. URN क्रमांक: फॉर्म जमा केल्यानंतर तुम्हाला URN क्रमांक मिळेल, ज्याच्या साह्याने तुम्ही अपडेटचा स्टेटस तपासू शकता. कालावधी: साधारणतः 90 दिवसांत तुमचा नवीन पत्ता आधार कार्डात अपडेट होईल. ऑनलाइन प्रक्रिया: UIDAI वेबसाइट: https://uidai.gov.in/ वर जा आणि “My Aadhaar” मधील “Update Demographics Data” पर्याय निवडा. आधार क्रमांक प्रविष्ट करा: तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका. पत्ता अपडेट: “Address” पर्याय निवडा आणि नवीन पत्ता प्रविष्ट करा. दस्तऐवज अपलोड: पत्त्याचा पुरावा (उदा. रेंट ॲग्रीमेंट, वीज बिल) आणि विवाह प्रमाणपत्राची स्कॅन कॉपी अपलोड करा. शुल्क: पत्ता अपडेटसाठी 50 रुपये शुल्क भरावे लागेल. पडताळणी आणि अपडेट: सर्व तपशील तपासल्यानंतर तुमचा पत्ता आधार कार्डात अपडेट होईल. महत्त्वाच्या टिप्स: -आधार कार्ड अपडेट करताना सर्व दस्तऐवज कागदपत्र स्पष्ट आणि वैध असावेत. -ऑनलाइन प्रक्रियेसाठी तुमच्याकडे आधारशी नोंदणीकृत मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे, कारण OTP सत्यापनासाठी याचा उपयोग होतो. -अपडेट स्टेटस तपासण्यासाठी URN क्रमांक UIDAI च्या वेबसाइटवर वापरा. -जर तुम्हाला कोणत्याही अडचणी आल्या, तर UIDAI च्या हेल्पलाइन 1947 वर संपर्क साधा. ही प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही सहजपणे आधार कार्डात नाव आणि पत्ता अपडेट करू शकता. ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतींमुळे ही प्रक्रिया अधिक सोयीस्कर झाली आहे.