मालाडमध्ये ‘या’ शिवसेना नेत्याच्या भावाचे नाव घेत तरुणाची आत्महत्या

मुंबई : मुंबईमधील मालाड येथून एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीने इंस्टाग्रामवर रिल्स टाकून आत्महत्या केली आहे. चंद्रेश तिवारी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे चंद्रशे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी इंस्टावर व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याध्ये त्यांनी एका बड्या शिवसेना नेत्याच्या भावाचे नाव घेत आत्महत्या करत असल्याचे सांगितले.
कोण आहे ‘तो’ नेता?
चंद्रेश तिवारी यांनी आपल्या पोस्टमध्ये रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांच्यासह आणखी दोघांची नावे घेत त्यांना जबाबदार ठरविले आहे. सदानंद कदम यांनी मुंबईत इतर कोणत्याही कंपनीत काम करू देणार नाही, असा इशारा चंद्रेश याला दिला होता.
याप्रकरणी, चंद्रेशचा भाऊ पावन तिवारी यांनी कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, सदानंद कदम यांच्यासह धमकी देणाऱ्या आणखी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.





