आळंदी : झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तरुणावर 5 ते 6 जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार केल्याची घटना आळंदी येथील मुथुट फायनान्स समोरील मोकळ्या जागेत रविवारी (दि. 8) सायंकाळी सुमारास घडली. विठ्ठल दौलत गुट्टे (वय 24, रा. आळंदी) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. या हल्ल्यात विठ्ठल गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महेश पितळे (रा. मरकळ रोड, आळंदी)सह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. नागेश बालाजी कांबळे (वय 19, रा. कुरुळी), आदित्य तुकाराम सातपुते (वय 22), विश्वजित दामोदर कदम (वय 20, दोघे रा. आळंदी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.