प्रभात वृत्तसेवा पिंपरी – लग्नानंतर पत्नीच्या पगाराचे पैसे स्वतःच्या व्यवसायासाठी वापरून आणि तिच्या नावावर कोट्यवधींचे कर्ज काढून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना जून २०२३ ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत पिंपळे निलख येथे घडली.सतिशकुमार गणाला (४०, पिंपळे निलख) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या ३४ वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयित आरोपीने फिर्यादीशी लग्न केल्यानंतर त्यांच्या पगाराचे पैसे स्वतःच्या व्यवसायात वापरले. व्यवसायात तोटा झाल्यावर त्याने फिर्यादीचा विश्वासघात करून त्यांना ५८ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज काढण्यास भाग पाडले. तसेच पत्नीची खोटी सही आणि बनावट कागदपत्रे तयार करून १७ लाख ६४ हजार रुपयांचे कर्ज काढून एकूण १ कोटी ४० लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. सांगवी पोलीस तपास करत आहेत.