नोकरीच्या आमिषाने महिलेची पावणेसहा लाखांची फसवणूक
Updated On:

सातारा – शासकीय नोकरीच्या आमिषाने महिलेची पावणेसहा लाख रुपयांची फसवणूक केली आणि तिच्यावर अत्याचार करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
अब्दुल राजकर रवाठार-शेख (रा. मिरज), तेजस्वी भास्कर चव्हाण (रा. पीरवाडी, सातारा) आणि हिना अमन अफराज (रा. करंजे, सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. जुलै ते डिसेंबर 2022 या दरम्यान हा प्रकार घडला आहे. शासकीय नोकरी देतो, असे म्हणून अब्दुल शेखने तक्रारदार महिलेकडून रोख स्वरूपात आणि ऑनलाइन माध्यमातून पाच लाख 87 हजार रुपये घेतले. तिला मारहाण केली. जिवे मारण्याची धमकी दिली. अत्याचारही केला, असे या तक्रारीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे तपास करत आहेत.





