Pune | रस्त्याच्या कडेला झाली महिलेची प्रसूती; वर्दीतील माणुसकीचे पुन्हा एकदा घडले दर्शन

Updated On:
Pune | रस्त्याच्या कडेला झाली महिलेची प्रसूती; वर्दीतील माणुसकीचे पुन्हा एकदा घडले दर्शन

वर्दीतील माणुसकीचा हा प्रसंग ऐकून नक्कीच तुमच्या अंगावर काटे उभा राहतील… पुण्याच्या हिंजवडी परिसरातील वाकड चौकात दोन महिला वाहतूक पोलिसांनी, प्रसूती वेदना होत असलेल्या महिलेची रस्त्याच्या कडेलाच सुरक्षित प्रसूती पार पाडली आहे.

या महिलेला प्रसूती वेदना होत असताना रुग्णवाहिका व डॉक्टर यांना पोहोचण्यास उशीर होणार असल्याचं लक्षात आलं आणि वाहतूक पोलीस नीलम चव्हाण आणि रेश्मा शेख यांनी प्रसंगावधान दाखवत मदतीसाठी धाव घेतली.प्रसूती वेदना होत असलेल्या राजश्री नावाच्या या महिलेला रस्त्याच्या कडेला असलेल्या एका शेडमध्ये नेत तिची प्रसूती सुरक्षितपणे पार पाडली…

राजश्री यांनी गोंडस मुलाला जन्म दिला असून प्रसूतीनंतर आई व बाळाला औंध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे…पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागात घडलेल्या या घटनेमुळे वर्दीतील माणुसकीचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे…वाहतूक पोलीस नीलम चव्हाण आणि रेश्मा शेख यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधनाचे सर्वत्र कौतुक होत आहे…

आणखी संबंधित बातम्या

Mundhwa Land Case : पार्थ पवार यांना न्‍यायालयाचा दिलासा; मुंढवा जमीन प्रकरणात आरोपी करण्याची मागणी फेटाळली

2026-11-20 17:37:39

Mundhwa Land Case : पार्थ पवार यांना न्‍यायालयाचा दिलासा; मुंढवा जमीन प्रकरणात आरोपी करण्याची मागणी फेटाळली

Pune : वाढदिवसाचा आनंद दुष्काळग्रस्तांसोबत! गौरव घुले यांची मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाखांची मदत

2026-11-20 16:28:38

Pune : वाढदिवसाचा आनंद दुष्काळग्रस्तांसोबत! गौरव घुले यांची मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाखांची मदत

Mohan Joshi : मोहन जोशी यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती

2026-11-20 16:21:00

Mohan Joshi : मोहन जोशी यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती

Pune : स्वतःचे दुकान थाटण्यासाठी दुसऱ्याचे दुकान खाली केले नाही ना? सत्ताधारी भाजपला हेमंत बागुल यांचा सवाल!

2026-11-20 12:58:27

Pune : स्वतःचे दुकान थाटण्यासाठी दुसऱ्याचे दुकान खाली केले नाही ना? सत्ताधारी भाजपला हेमंत बागुल यांचा सवाल!

Pune Timber Market Fire : ४५ दुकाने, ६ घरे आगीच्या भक्ष्यस्थानी; टिंबर मार्केटच्या आगीचं गूढ कायम, पोलिसांकडून अग्निशमन विभागाला पत्रव्यवहार

2026-11-20 12:32:48

Pune Timber Market Fire : ४५ दुकाने, ६ घरे आगीच्या भक्ष्यस्थानी; टिंबर मार्केटच्या आगीचं गूढ कायम, पोलिसांकडून अग्निशमन विभागाला पत्रव्यवहार