फोटो अन्‌ व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिला डॉक्‍टरवर बलात्कार

Updated On:
फोटो अन्‌ व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिला डॉक्‍टरवर बलात्कार

मुंबई  – मुंबईत एका महिला डॉक्‍टरवर बलात्कार केल्याप्रकरणी एका 38 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी गमदेवी पोलिस ठाण्यात बलात्कार आणि ब्लॅकमेलचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने यासंदर्भात स्वतः पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने बलात्कार करून तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि ब्लॅकमेल करून पैसे घेतले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने पीडितेकडे आणखी पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली.

एका क्‍लबमध्ये बॅडमिंटन खेळत असताना आरोपी आणि पीडितेची ओळख झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. घरगुती कारणांमुळे महिला एकटी आणि पतीपासून वेगळी राहत होती. या विषयावर बोलण्यासाठी व्यक्तीने बोलण्याची ऑफर दिली होती. परंतु जेव्हा महिला त्याला भेटायला गेली तेव्हा त्याने तिला मद्यपान करून दिले आणि त्यानंतर ती बेशुद्ध झाली आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पैसे न दिल्यास तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिच्याकडून पैसे घेतले.

नेमके काय घडले?
घटना 20 ऑगस्ट रोजीची आहे. आरोपीने पीडितेला एका क्‍लबमध्ये बोलावले. दरम्यान, क्‍लबमध्ये गेल्यानंतर आरोपीने पीडितेला जबरदस्तीने वाईन पाजली. त्या वाईनमध्ये आरोपीने काहीतरी मिसळले होते. वाईन प्यायल्यानंतर काही वेळातच महिला बेशुद्ध झाली. नंतर त्याने पीडितेला कारमधून आपल्या घरी नेले. तिथे गेल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी तिचे काही फोटो आणि व्हिडिओ काढले आणि त्याच्याच आधारे महिलेला वारंवार ब्लॅकमेल करू लागला.

आणखी संबंधित बातम्या

Jamkhed News: जामखेडमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर दगडफेक; तिघांवर गुन्हा दाखल

2026-10-07 11:15:40

Jamkhed News: जामखेडमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर दगडफेक; तिघांवर गुन्हा दाखल

Ranjangaon : सुपारी दिली मालकाच्या हत्येची अन् गोळ्या लागल्या निष्पाप कामगाराला; पाच जणांना अटक, दोघांचा शोध सुरू

2026-10-06 13:03:57

Ranjangaon : सुपारी दिली मालकाच्या हत्येची अन् गोळ्या लागल्या निष्पाप कामगाराला; पाच जणांना अटक, दोघांचा शोध सुरू

Baramati: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; 51 हजारांचा मुद्देमाल लंपास

2026-10-05 12:22:50

Baramati: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; 51 हजारांचा मुद्देमाल लंपास

Punjab News : पंजाबमधील शस्त्रास्त्रांच्या तस्करीचे नेटवर्क उद्ध्वस्त

2026-10-04 22:20:05

Punjab News : पंजाबमधील शस्त्रास्त्रांच्या तस्करीचे नेटवर्क उद्ध्वस्त

Mad Sandhu: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला गोळ्या घालून संपवलं; गँगस्टर गोल्डी ढिल्लनने घेतली हत्त्येची जबाबदारी

2026-10-04 14:41:01

Mad Sandhu: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला गोळ्या घालून संपवलं; गँगस्टर गोल्डी ढिल्लनने घेतली हत्त्येची जबाबदारी