विदर्भातला शेतकरी पवारांना म्हणाला,’आमच्याकडे लक्ष देणारं खरोखरच कुणी जन्मलेलं नाहीये अजूनही’

गडचिरोली – विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज गडचिरोली जिल्ह्यातील शिवणे गावात बांधावर जाऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबाबत शेतकऱ्यांची विचारपूस केली, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नुकसानाचे पंचनामे करून पूरग्रस्तांना आवश्यक ती आर्थिक मदत तातडीने राज्य शासनाच्यावतीने करण्यात यावी, असे अजित पवार यांनी सांगितले.
यावेळी अजित पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला, शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यावर तोडगा काढला जावा अशी मागणी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे केली आहे. शेतकरी म्हणाले,’ शेतकरी हा सर्वकाही दुसऱ्यासाठी करतो पण त्याच्या प्रश्नांकडे लक्ष देणारा अजून जन्मलेलाच नाही असे म्हणत एका शेतकऱ्याने सांगा शेती करायची कशी ? असा सवाल शेतकऱ्यांनी थेट विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या समोर उपस्थित केला.
पहा व्हिडिओ





