Pooja Gavas Post : नियतीचा फेरा कुणाला चुकलेला नाही. त्यामुळे सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कधी काय होईल, हे सांगणे कठीण आहे. २०२५ मधील एक घटना. रेड सॅाईल स्टोरीच या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून शिरीष आणि पूजा गवस यांनी मोठी लोकप्रियता मिळवली. सगळ काही सुरळीत चालू असताना अचानक शिरीषने एक्सिट घेतली. या घटनेमुळे सगळ्यानांचा मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आता पूजा गवस यांच्या वडिलांचं निधन झाल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पूजा यांनी सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी केली आहे. ‘रेड सॉईल स्टोरीज’ या युट्यूब चॅनेलच्या सब्सक्राइबरची संख्या मोठी आहे. याचे कारण कारण म्हणजे शिरीष आणि पूजा गवस या जोडप्याने कोकणातील संस्कृतीचे घडवलेले दर्शन. या जोडप्याने त्यांच्या या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून कोकणातील ग्रामीण संस्कृतीचे दर्शन चाहत्यांना घडवले. २०२५ च्या अॅागस्ट महिन्यात पूजाचा जोडीदार शिरीषचे आकस्मिक निधन झाले. शिरीषच्या अकाली जाण्याने पूजाच्या पायाखालची जमीनच सरकली. हे दुःख पचवणे तिच्यासाठी खूप कठीण होते. पतीला एक वर्ष होत नाही तोवरच तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पूजा गवसच्या वडिलांचे कॅन्सरने निधन झाले आहे. वडिलांच्या आठवणींना उजाळा देत पूजाने सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने वडिल, आई आणि ती स्वतः असा तिघांचा एक फोटोही शेअर केला आहे. पोस्टमध्ये काय म्हणाली पूजा गवस? प्रिय पपा, अखेर तुम्ही सुद्धा सोडून गेलात. आधी श्रीजाने तिचा बाबा गमावला आणि आता तिचे आजोबा. आता कुठे एका वादळातून किनारा गाठण्याचा प्रयत्न सुरू होता आणि नशिबाने दुसरे चक्रीवादळ पुढ्यात आणून ठेवले, असे पोस्टमध्ये पूजाने म्हटले आहे. ११ वर्ष तुम्ही कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी झुंज दिलीत. ती सुद्धा न डगमगता न हार मानता. खर सांगू जेव्हा शिरीषच्या आजाराबद्दल पहिल्यांदा कळला तेव्हा सर्वात आधी तुम्हीच माझ्या डोळ्यासमोर आला होतात. वाटलेला तुम्ही इतके वर्ष आजाराशी दोन हात करताय मग शिरीषला सुद्धा काहीच होणार नाही. पण आज सगळेच विचार, सगळे निश्चय हरले. या आजाराच्या कितीतरी जीवघेण्या यातना तुम्ही कसलीच तक्रार न करता सहन केल्या. तुमची आलेल्या परिस्थितीशी लढण्याची ताकद माझ्यासाठी कायम प्रेरणादायी राहील, अशा शब्दांत तिने वडिलांचे आभार मानले आहेत. View this post on Instagram A post shared by Red Soil Stories (@redsoilstories) माझं विचारांनी दाटलेला मन मोकळं करण्यासाठी रोज संध्याकाळी मी आणि श्रीजा तुम्हाला व्हिडिओ कॉल करायचो. पण आता तो मार्ग सुद्धा देवाने कायमचा बंद केला. या सगळ्यासाठी देवा तुझे किती आभार मानू..अजून काय काय लिहून ठेवलयस माझ्या साठी ते एकदाच सांगुनच टाक. तू दुःख देत राह पण ते पेलण्याची ताकद सुध्दा तूच दे. तुमच्या आजारपणात ज्या खंबीरपणे तुम्हाला मम्मीने साथं दिलीये तोच खंबीरपणा घेऊन मी जगायचं ठरवलंय. काही झालं तरी हार मानायची नाही हे शिकवण तुम्ही दोघांनी दिलीये. जोपर्यंत श्वास घेतोय तोपर्यंत लढत रहायचं. पपा.. जिथे कुठे असाल सुखात राह. कायम पाठीशी राहा. शिरीषशी भेट झाली तर त्याला सांगा आम्ही आमची काळजी घेतोय..तू निश्चिंत रहा.. आम्हाला आशीर्वाद देत राह. तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अशा शब्दांत पोस्टमध्ये पूजाने वडिलांसाठी भावाना व्यक्त केल्या आहेत. हेही वाचा : Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरने घेतलं अंबाबाईचं दर्शन! नतमस्तक होत केली प्रार्थना, व्हिडिओ व्हायरल