पुणे : शिवाजीनगर येथील शिमला ऑफिस परिसरात मध्यरात्री अचानक मोठे झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. माहिती मिळताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी चैन सॉ, कुऱ्हाड आदी उपकरणांच्या सहाय्याने झाडाच्या मोठ्या फांद्या कापून झाड बाजूला केले. सुमारे काही वेळातच रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या घटनेत कोणतीही जखमी किंवा जीवितहानी झालेली नसल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. संभाव्य अपघात टाळण्यासाठी परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यात आली असून नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.