रायगड : रायगडच्या श्रीवर्धनमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील पर्यटकांच्या थारने एका तरुणाला चिरडले आहे. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. परवेज हमदुले असे मृत तरुणाचे नाव आहे. पुण्यावरुन श्रीवर्धनमध्ये फिरण्यासाठी आलेल्या पुण्यातील पर्यटकांच्या वाहनांनी दोन मोटार सायकलींना जोरदार धडक दिली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन बाजार पेठेत धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला आहे. अपघातग्रस्त थार आणि 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. श्रीवर्धन पोलिस ठाण्यात आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. पर्यटक पुण्याहून श्रीवर्धनमध्ये फिरण्यासाठी आले होते. यावेळी हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.