नगर: नगर शहरामध्ये दुबई येथे जावून आलेला कोरोनाचा एक संशयित रुग्ण आढळून आला आहे. या संशयित रुग्णाला सामान्य रुग्णालय, अहमदनगर येथे विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान, सध्या गावोगाव भरणाऱ्या यात्रा व उरुसाच्या पार्श्वभूमीवर गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच काळजी करावयाचे किंवा घाबरण्याचे कुठलेही कारण नसून सर्व नागरिकांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.