Trisha Krishnan : उदयनिधी स्टॅलिन यांच्या त्या वक्तव्यावर जोरदार पलटवार! त्रिशाने चांगलचं सुनावलं म्हणाली…
Trisha Krishnan : या वादग्रस्त वक्तव्यावर आता अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिने सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत जोरदार पलटवार केल्याची चर्चा आहे.

Trisha Krishnan : गेल्या काही दिवसांपूर्वी तामिळनाडू राज्याचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन एका वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठ्या अडचणीत सापडले होते. कावेरी नदीच्या पाणी प्रश्नाच्या आंदोलनदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. ज्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. या वादग्रस्त वक्तव्यावर आता अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिने सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत जोरदार पलटवार केल्याची चर्चा आहे.
‘या वयात नाटक करणे लाजिरवाणे आहे’
उदयनिधी स्टॅलिन यांच्या अश्लील वक्तव्यानंतर त्रिशा कृष्णनने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. “या वयात नाटकात गुंतणे लाजिरवाणे आहे. जा आणि थोडे पैसे कमवा आणि शांतता मिळवा.” अभिनेत्रीने या पोस्टसोबत एक डोळे वर केलेला इमोजी देखील शेअर केला आहे.
अभिनेत्रीने आणखी एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, “तुम्ही जे काही करता ते तुमच्याकडे परत येते, म्हणून इतरांचे भले करा, आणि तुमचेही भले होईल.” या पोस्टमध्ये अभिनेत्रीने कोणाचेही नाव घेतले नसली तरी ही पोस्ट उदयनिधी यांच्यासाठी असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या पोस्टचा संदर्भ युझर्स उदयनिधी यांच्यासोबत जोडत आहेत.
नेमकं काय घडलं होतं?
माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी कावेरी पाणी तंटा वादाचा मुद्दा उपस्थित करताना म्हटले होते की, मुख्यमंत्री कावेरी पाणी प्रश्नावर काहीही बोलत नाहीत, उलट डीएमकेवर खोटे खटले दाखल करत असल्याची त्यांना जास्त चिंता आहे. याच दरम्यान, जेव्हा तिथे उपस्थित असलेल्यांपैकी कोणीतरी त्रिशाचे नाव घेतले, तेव्हा ते हसले आणि एक वक्तव्य केले. ज्यामुळे मोठा वाद आणि राजकारण तापले होते.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय जोसेफ यांच्या टीव्हीके (TVK) पक्षाने केलेल्या तक्रारीनंतर उदयनिधी स्टॅलिन यांना त्यांच्या चेन्नई येथील निवासस्थानातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. के. इलंथिरयन यांनी चौकशी पूर्ण झाल्यावर उदयनिधी स्टॅलिन यांना सोडण्याचे आदेश पोलिसांना दिले.






