प्रभात वृत्तसेवा इंदापूर – इंदापूर शहरात प्लॅस्टिक मुक्त व अतिक्रमण मुक्त इंदापूर या मोहिमेअंतर्गत मुख्य रस्ता व महामार्ग परिसरात कडक कारवाई करण्यात आली. त्यामुळे इंदापूर नगरपरिषदेचे प्लॅस्टिक मुक्त आणि अतिक्रमण मुक्त इंदापूरच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे.इंदापूर नगरपरिषदेचे प्लॅस्टिक मुक्त अभियान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर नगरपरिषदेतर्फे ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी अनधिकृत अतिक्रमण हटवण्यात आले. सिंगल यूज प्लॅस्टिकवर बंदी व स्वच्छ, सुंदर आणि नियमबद्ध इंदापूर शहराच्या निर्मितीसाठी आपण सर्वांनी सहकार्य करा असे आवाहन करण्यात आले; मात्र कुणावर कारवाई केली याची माहिती मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी पत्रकारांना दिली नाही. भ्रमणध्वनी देखील उचलला नाही. त्यामुळे हा दिखावा आहे की खरच कारवाई झाली, याबाबत मात्र कुजबुज निर्माण झाली आहे. नुसता दिखवा न करता स्पष्ट स्वच्छ पारदर्शक कारभार नगरपरिषदेचा प्रशासनाच्या काळात व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.