प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पतीने फोन केल्यानंतर पत्नीने फोन उचलला नाही. या कारणावरून संतापलेल्या पतीने पत्नीच्या गळ्यावर पाय देत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (दि. 12) सायंकाळी तळेगाव दाभाडे येथे घडली.राजश्री संतोष बिसनाळ (वय 34, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी शुक्रवारी (दि. १४) याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष नागप्पा बिसनाळ (वय 44) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष आणि फिर्यादी राजश्री हे पती-पत्नी आहेत. संतोष याने पत्नी राजश्री यांना फोन केला. मात्र राजश्री यांनी तो फोन उचलला नाही. या कारणावरून त्याने घरी आल्यावर पत्नी राजश्री यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. सेफ्टी शूजने त्यांच्या पोटावर मारले. तसेच गळ्यावर पाय ठेवून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. तळेगाव दाभाडे पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.