आयसिसच्या निशाण्यावर आता लहान देश – मैत्रीपाल सिरिसेन 

नवी दिल्ली – कुख्यात दहशतवादी संघटना आयसिसने आता लहान देशांना लक्ष्य करण्याची नवीन रणनीती सुरु केली आहे, असे श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेन यांनी म्हंटले आहे. दरम्यान, दहशतवादी अबू बकर अल-बगदादी अद्यापही जिवंत असल्याचे पाच वर्षांनी एका व्हिडीओद्वारे समोर आले आहे. यामध्ये अल-बगदादीने ईस्टर संडे दिनी श्रीलंकेतील साखळी स्फोटांची जबाबदारीही स्वीकारली आहे. या पार्श्वभूमीवर मैत्रीपाल सिरिसेन बोलत होते.

मैत्रीपाल सिरिसेन म्हणाले कि, माझ्या देशातील अधिकाऱ्यांना माहित आहे कि, श्रीलंकेच्या काही नागरिकांनी मागील वर्षी आयएस प्रशिक्षणासाठी परदेश यात्रा केल्या आहेत. माझ्या देशाला एकटे सोडावे, असा संदेशही राष्ट्रपतींनी यावेळी दिला.

दरम्यान, श्रीलंकेत ईस्टर संडे  झालेल्या आत्मघातकी स्फोटांचा अंतिम अहवाल तीन सदस्यीस समितीने राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेन यांच्याकडे सोपविला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.