Shirur News : एका पावसाने होत्याचं नव्हतं केलं; शेतकरी प्रभाकर राऊत यांची केळी बाग जमीनदोस्त
Shirur News : पीक हातचे गेल्याने मुलांच्या शिक्षणाचा आणि घरखर्चाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Shirur News : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील गायकवाड मळा परिसरात काल संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी प्रभाकर तुकाराम राऊत यांचे मोठे नुकसान झाले आहे.
अडीच एकर क्षेत्रातील केळीचे पीक वादळी पावसामुळे कोसळून जमीनदोस्त झाली आहे. या पिकासाठी तब्बल 4 ते 5 लाख रुपयांचा खर्च झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
आता केळीचे पीकचं जमीनदोस्त झाल्याने मोठे आर्थिक संकट या शेतकऱ्यासमोर आ-वासून उभे राहले आहे. पीक हातचे गेल्याने मुलांच्या शिक्षणाचा आणि घरखर्चाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, या घटनेनंतर अद्याप कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा प्रशासनाने पंचनामा करण्यासाठी भेट दिलेली नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची मागणी परिसरातून केली जात असून, मदतीसाठी कृषीधिकारी यांना फोन केला असता नॅाट रिचिबल लागत आहे.





