Ambernath News | राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे. तर १६ जानेवारीला या निवडणुकांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्याअनुषंगाने आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र याचदरम्यान अंबरनाथ पश्चिमेतील नवीन भेंडीभाडा परिसरात मध्यरात्री एक खळबळजनक घटना घडली आहे. भाजपचे प्रभाग क्रमांक ४ क मधील उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी ४ राऊंड फायर केल्या आहेत. या गोळीबारात सुदैवाने कुणीही जखमी अथवा मृत झाल्याची नोंद नाही. मात्र या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. Ambernath News | नेमकं काय घडलं? अंबरनाथ पश्चिमेकडील नवीन भेंडी पाडा या परिसरात पवन वाळेकर यांचे कार्यालय आहे. बुधवारी रात्री १२.१५ च्या सुमारास भाजप उमेदवार पवन वाळेकर हे कार्यकर्त्यांसोबत कार्यालयात उपस्थित होते. त्याचवेळी दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरुन आल्या आणि त्यांनी कार्यालयाच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. यावेळी हल्लेखोरांनी कार्यालयावर ४ ते ६ राऊंड फायर केले. सुदैवाने या गोळ्या कार्यालयाच्या समोरच्या काचेवर आणि काही भागांवर लागल्या. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर तातडीने घटनास्थळावरून पसार झाले. फडणवीस अंबरनाथ दौऱ्यावर महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंबरनाथच्या दौऱ्यावर आहेत. भाजपच्या उमेदवारासाठी देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. पण त्याआधीच उमेदवाराच्याच कार्यालयावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची पोलिसांनी नोंद केली असून तपास केला जात आहे. Ambernath News | दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. या गोळीबार प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार कार्यालयाच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले असून, त्याआधारे हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. हेही वाचा: Best Web Series 2025: OTT विश्वावर जयदीप अहलावतची मोहोर, अनन्या पांडे ठरली बेस्ट अभिनेत्री