Satyendra Soni : ‘लापता लेडीज’मधील छोटूसोबत घडला भयंकर प्रकार! व्हिडिओ शेअर करत धसाधसा रडला
Satyendra Soni : व्हिडिओमध्ये सत्येंद्र याच्यासोबत जे काही घडलं ते सांगताना त्याला अश्रू अनावर झाले आणि तो धसधसा रडला.

Satyendra Soni : ‘लापता लेडीज’ या लोकप्रिय चित्रपटात झळकलेला अभिनेता सत्येंद्र सोनी याच्यासोबत एक भयंकर प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर त्याने शेअर केलेल्या एका भावनिक व्हिडिओत दिग्दर्शक पुष्पेंद्र सिंग यांच्यावर मानधन न देणे, धमकावणे आणि अडचणीत टाकल्याचे गंभीर आरोप केले आहेत. यामुळे मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
व्हिडिओमध्ये सत्येंद्र याच्यासोबत जे काही घडलं ते सांगताना त्याला अश्रू अनावर झाले आणि तो धसधसा रडला. तो म्हणाला, ‘पेड पालकी’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मध्य प्रदेशातील मैहर येथे गेले होतो. सुरुवातीला दिग्दर्शकाने ५० हजार रुपयांची साइनिंग अमाऊंट दिली. मात्र, उर्वरित मानधन शूटिंगदरम्यान देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. ते पूर्ण करण्यात आले नाही. उलट आठ दिवसांचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर मानधनाची मागणी करताच त्याला पॅकअप करण्यास सांगण्यात आले आणि हॉटेल सोडण्यास भाग पाडत दिग्दर्शकाने थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
सत्येंद्र याच्या म्हणण्यानुसार, त्याचे सामान हॅाटेलमधून बाहेर काढण्यात आले आणि त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या घटनेनंतर त्याने सोशल मीडियावर मदतीची याचना करणारा एक व्हिडिओ पोस्ट केला. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि अनेकांनी त्याला मदतीचा हात पुढे केला. मध्य प्रदेश पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेत आवश्यक सहकार्य केले.
View this post on Instagram
हेही वाचा : Akanksha & Gaurav Khanna Divorce: “आम्ही एकमेकांसाठी योग्य नाही”; आकांक्षाचा पती गौरव खन्नासोबत घटस्फोट
यानंतर सत्येंद्र याने आणखी एक व्हिडिओ शेअर करत आपण सुरक्षित असल्याची माहिती दिली. या व्हिडिओत तो आपल्या सहकाऱ्यांसोबत रेल्वे स्थानकावर दिसत आहे. त्याने सांगितले की, अनेकांच्या मदतीमुळे तो सुखरूप मुंबईत परतला आहे. तसेच मैहर पोलिसांचे आणि मदतीसाठी पुढे आलेल्या सर्वांचे त्याने आभार मानले.
View this post on Instagram
त्याच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनीही हा प्रवास मानसिकदृष्ट्या अत्यंत कठीण असल्याचे सांगितले. अनेक अनोळखी लोकांनी फोन करून धीर दिला आणि सतत संपर्कात राहिल्यामुळे या संकटातून बाहेर पडणे शक्य झाल्याचे त्याने नमूद केले. मात्र, संबंधित दिग्दर्शकावर काही कारावाई करण्यात आली का नाही याची माहिती मिळू शकलेली नाही.
कोण आहे सत्येंद्र सोनी?
सत्येंद्र सोनी याने किरण राव यांच्या ‘लापता लेडीज’ चित्रपटात ‘छोटू’ ही भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली होती. तसेच तो ‘मिर्झापूर: द मुव्ही’मध्येही झळकणार आहे. प्रतिकूल परिस्थिती आणि कमी उंचीवरून मिळणाऱ्यांना टोमण्यांकडे दुर्लक्ष करत त्याने अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, सध्या त्याने केलेल्या आरोपांमुळे हा संपूर्ण प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे. या आरोपांवर संबंधित दिग्दर्शकाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.
हेही वाचा : Siya Chetan Video : मॅच पाहताना सिया आणि चेतनचा जुना VIDEO व्हायरल; ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष!





