Video : महाबळेश्वरात मुख्यमंत्र्याचे जल्लोषी स्वागत; भर पावसात समर्थकांची मोठी गर्दी

Updated On:
Video : महाबळेश्वरात मुख्यमंत्र्याचे जल्लोषी स्वागत; भर पावसात समर्थकांची मोठी गर्दी

पाचगणी(सादिक सय्यद,प्रतिनिधी) :– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी साठी आज सायंकाळी महाबळेश्वर येथे आगमन झाले. या वेळी मुसळधार पावसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महाबळेश्वरकरांनी जल्लोषात स्वागत केले. फटाक्‍यांची आतषबाजी व एकनाथ शिंदे यांच्या विजयाच्या घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक परीसर दूमदुमला होता. अतिरिक्त जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख यांनी त्यांचे शहरात पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. शहरवासियांच्या वतीने तहसिलदार सुषमा चौधरी पाटील यांनी तर पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.

शिवसेनेतील 40 आमदारांचा गट घेवुन एकनाथ शिंदे यांनी भाजपा बरोबर युती करून नवीन समीकरणे अस्तित्वात आणली. अनेक राजकीय नाट्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा एकनाथ शिंदे यांच्या हातात आली . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर तालुक्‍यातील दरे गावचे सुपुत्र असुन मुख्यमंत्री पदाची धुरा स्विकारल्या नंतर ते प्रथमच महाबळेश्वर दौऱ्यावर आले होते.

यावेळी आमदार व माजी मंत्री शंभुराज देसाई हे देखिल त्यांच्या सोबत होते. आपल्या दरे गावी जाण्यापुर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या स्वागताची जंगी तयारी केली होती. सायंकाळी त्यांचे येथे आगमन झाले. या वेळी फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. त्यांच्या समर्थकांनी घोषणांनी चौक दणाणुन सोडला होता.

सातारा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा व जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल हे देखिल या वेळी उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, पंचायत समितीचे माजी सभपती संजय गायकवाड, माजी नगरसेविका विमल ओंबळे, विजय नायडु सुभाष कारंडे आदी मान्यवरांनी या वेळी त्यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले.

महाबळेश्वर तालुका वारकरी संघटनेचे पदाधिकारी चंद्रकांत बावळेकर दत्तात्रय भिलारे यांनी देखील त्यांचे स्वागत केले. या वेळी त्यांच्या स्वागतासाठी नागरिकांनी भर पावसात छत्रपती शिवाजी महाराज चौकात गर्दी केली होती. मुख्यमंत्री यांनी येथील भवनीमातेचे दर्शन घेवुन या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला हार घालुन त्यांनी अभिवादन केले. या नंतर त्यांनी लोकांच्या स्वागताचा स्वीकार केला व नागरिकांना अभिवादन करून ते तापोळयाला रवाना झाले.

तत्पुर्वी आमदार शंभुराज देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चरणस्पर्श करून आशिर्वाद घेतला व ते साताराकडे रवाना झाले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होताच महाबळेश्वर तालुक्‍यातील 105 गावांच्या संघटनेने त्यांना आपला पाठींबा जाहीर केला होता. आज याच 105 गावातील एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी तापोळा येथे भुमिपुत्राच्या स्वागताची जंगी तयारी केली होती.

आज तापोळा येथे त्यांनी ग्रामस्थांच्या स्वागताचा स्वीकार केला. त्यांच्याशी संवाद साधुन ते आपल्या दरे गावाकडे रवाना झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली असली तरी अनेक कट्ट्र शिवसैनिकांनी मुख्यमंत्री यांच्या या दौऱ्याकडे दुर्लक्ष केले होते. काही मोजकेच शिवसैनिक या वेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा झाले होते. या बाबतही उपस्थितांमध्ये चर्चा सुरू होती.

आणखी संबंधित बातम्या

Sharad Pawar : दुष्काळावर विशेष अधिवेशन बोलवा.! शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पुन्‍हा पत्र, केल्या 'या' 17 मागण्या

2026-09-27 19:47:00

Sharad Pawar : दुष्काळावर विशेष अधिवेशन बोलवा.! शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पुन्‍हा पत्र, केल्या 'या' 17 मागण्या

Eknath Shinde : ‘विरोधकांच्या पोटदुखीवर एखादं झाड शोधतो!’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा मिश्किल टोला

2026-09-18 18:55:49

Eknath Shinde : ‘विरोधकांच्या पोटदुखीवर एखादं झाड शोधतो!’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा मिश्किल टोला

Mahabaleshwar News: गेल्या वर्षाचा रेकॉर्ड मोडणार? महाबळेश्वरमध्ये पावसाचा धुमाकूळ, पर्यटकांची तुफान गर्दी

2026-08-18 00:30:05

Mahabaleshwar News: गेल्या वर्षाचा रेकॉर्ड मोडणार? महाबळेश्वरमध्ये पावसाचा धुमाकूळ, पर्यटकांची तुफान गर्दी

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आरोग्य केंद्रात पाहणी; थेट औषधांच्या एक्स्पायरी डेट्स तपासल्या

2026-08-08 00:15:01

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आरोग्य केंद्रात पाहणी; थेट औषधांच्या एक्स्पायरी डेट्स तपासल्या

Free education : आदिवासी मुलांनी मुख्यमंत्र्यांना पाठवली पोस्टकार्ड; १८ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी मोफत शिक्षणाची मागणी

2026-07-05 21:05:34

Free education : आदिवासी मुलांनी मुख्यमंत्र्यांना पाठवली पोस्टकार्ड; १८ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी मोफत शिक्षणाची मागणी