जेजुरी : पुणे जिल्ह्यातील जेजुरी नगरपरिषदेसाठी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. जेजुरी नगरपरिषदेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे. जयदीप दिलीप बारभाई हे जेजुरी नगरपरिषेदवर नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. पक्षाला घवघवीत विजय मिळल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भंडारा उधळून फटाके फोडून विजयोत्सव साजरा केला. जेजुरी नगरपरिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत ही नगरपरिषद काँग्रेस पक्षाकडे होती. त्यानंतर २०२५ मध्ये निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादीने पुन्हा एकदा यश मिळवून १७ उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात थेट लढत होती. या निवडणुकीत भाजपाचा सुपडा साफ झाला आहे. भाजपचे केवळ दोन उमेदवार विजयी झाले आहेत. तर तानाजी खोमणे अपक्ष उमेदवार यांचा देखील विजय झाला आहे. जेजुरी नगरपालिकेच्या 2025 2030 चे सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले आहे. नगराध्यक्षपदी जयदीप बारभाई यांनी तब्बल 3521 मतांनी दणदणीत मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 20 नगरसेवकांपैकी 17 जागी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी आहेत.