अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्याला पोलीस कोठडी

पुणे – अल्पवयीन मुलीला पळवून नेवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्याला 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश एन.के.मणेर यांनी दिला आहे.

संजय वसंत नलावडे (वय 23, रा. दत्तवाडी) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित 17 वर्ष सहा महिन्याच्या मुलीच्या वडिलांनी सहकारनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना 19 जून 2018 रोजी धनकवडी, चव्हाणनगर येथून घडली. चुलत्याकडे राहत असलेल्या पीडितेला पळवून नेवून तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात संजय याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. त्यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आजारी पडल्याने त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी 18 जानेवारी रोजी तो तेथून पळून गेला होता. त्याला पुन्हा अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी तो पळून कोठे गेला होता. पळून जाण्यासाठी त्याला कोणी मदत केली, त्याची सक्षमतेची चाचणी करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.