विकास दुबेच्या चकमकीच्या शक्यतेची सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती याचिका

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबे याला ठार करण्यात आले आहे. मात्र, त्याला सुरक्षित ठेवण्याचा आदेश देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका त्याच्या प्रत्यक्ष हत्येपूर्वी काही तास अगोदरच सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती.

विकास दुबेच्या पाच साथीदारांच्या हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखेखाली चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही याचिकेत  करण्यात आली होती. 2 जुलैला दुबेने आठ पोलिसांची हत्या केल्यानंतर आत्तापर्यंत पोलिसांनी दुबेच्या पाच साथीदारांचा केलेला एन्काऊंटरही बनावट होता, असा दावा या याचिकेत करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयातील वकिल घनशाम उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली होती. काल दुपारी 2 वाजताच त्यांनी ही याचिका दाखल केली आणि आज दुबेची हत्या झाली आहे.

दरम्यान, विकास दुबेला अटक केल्यानंतर विशेष पथक त्याला घेऊन कानपूरला चालले होते. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाला. यानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. विकास दुबे याने पोलिसांचं शस्त्र घेऊन गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी विकास दुबेला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. यादरम्यान झालेल्या चकमकीत पोलिसांनी विकास दुबेला ठार करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.