पिंपरी – थेरगावमधील दत्त नागरी सहकारी पतसंस्था, शिव छत्रपती प्रतिष्ठान आणि मावळ लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष विश्वजित बारणे यांच्या वतीने दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. तब्बल 700 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्यांना शालेय बॅगचे मोफत वाटप करण्यात आले.
चिंचवडे लॉन येथे झालेल्या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे, अभिनेत्री साक्षी गांधी, मावळ लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष विश्वजित बारणे, जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख निलेश तरस, जिल्हा संघटीका शौलाताई पाचपुते, महिला शहर संघटीका सरीता साने, तुळजाभवानी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक लहु नवले, दत्तनागरी पत संस्था उपसंचालक दिलीप बोंबले पाटील, हनुमंत माळी, धनाजी बारणे, बशीर सुतार, बाळासाहेब वाघमोडे, नंदू जाधव, संतोष बारणे इतर शिवसेना, युवासेना पदाधिकारी, बॅंकेचे शिष्टमंडळ व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, विद्यार्थ्यांनी केवळ पदवी घेण्यावर भर न देता व्यावसायिक अभ्यासक्रमांकडेदेखील लक्ष द्यावे. या क्षेत्रात केंद्र व राज्य सरकारचे विविध कोर्स उपलब्ध आहेत. त्यामधून तुम्ही नोकरी देणारे होताल. पिंपरी-चिंचवड औद्योगिक शहर आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक शहरात रोजगारासाठी येतात. त्यामुळे पदवी घेवून नोकरी करण्यापेक्षा व्यावसायिक अभ्यासक्रम शिकून व्यावसायिक व्हावे.
जगात वेगाने बदल घडत आहेत. पुढील दहा वर्षांचा काळ देशाचा आणि जगाचा चेहरा मोहरा बदलणारा असणार आहे. त्यामुळे पुढच्या दहा वर्षात कोणत्या क्षेत्राला महत्व राहील याची माहिती आताच विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने त्यांना करिअर निवडता येईल. आर्टीफिशयल इंनटीजिलीएंट, आरोग्य या क्षेत्रात सातत्याने बदल होत आहेत. पर्यावरणात सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे पुढच्या दहा वर्षाचे नियोजन करून क्षेत्र निवडावे. यशस्वी होऊन शहराचे नाव करावे. आवडीच्या क्षेत्रात आपण झपाटून आणि मन लावून काम करतो,असे मार्गदर्शन विश्वजित बारणे यांनी केले.
अभिनेत्री साक्षी गांधी म्हणाल्या, आजच्या सोशल मीडियाच्या युगात पुस्तकी ज्ञान व संस्कारदेखील तेवढेच महत्वाचे आहे. कला क्षेत्रात येण्यास इच्छूक असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे त्या म्हणाला.
थेरगाव : दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सतकर करण्यात आला. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, मावळ लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष विश्वजीत बारणे, अभिनेत्री साक्षी गांधी इतर मान्यवर उपस्थित होते.