Pune : स्वारगेट प्रकरणात नवा ट्वीस्ट ? आरोपीच्या वकीलांनी सर्व आरोप फेटाळले; केला ‘हा’ मोठा दावा; आरोपीला बलात्कार करायचा नव्हता पण…

पुणेः स्वारगेट प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता गाडेला शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत असून आरोपीच्या वकीलांनी माध्यमांशी बोलताना अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आरोपीने पोलिसांना देलेल्या जबाबात संगनमतीने ही गोष्ट झाल्याचे सांगितले आहे. तसेच आरोपीला त्या तरुणीचा बलात्कार करायचाच नव्हता अशी देखील माहिती समोर आली आहे.
या प्रकरणावर आरोपीच्या वकीलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही आरोपीशी चर्चा केली. त्याला आम्ही सत्य घटना काय आहे? अशी विचारणा केली असता, तो म्हणाला की, बसमध्ये आधी पीडित तरुणी चढली होती. नंतर मी गेलो. आमच्यात जे झाले ते दोघांच्या संमतीने झाले, असल्याची माहिती दिली. यावेळी पत्रकारांनी आरोपीने पळ का काढला असा प्रश्न आरोपीच्या वकिलांना विचारला असता ते म्हणाले त्याबाबत आम्हाला अद्याप माहिती नाही.
ते दोघे एक महिन्यापासून एकमेकांना ओळखतात?
तसेच या प्रकरणात पैशांचा व्यवहार झाल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. आरोपीच्या वकीलांनी दत्ता गाडे आणि ती मुलगी एकमेकांना एक महिन्यापासून ओळखतात. त्यांचे कॉल रेकॉर्डस काढले तर समजेल. बसमधून दोघे एकत्रच उतरले. बसमधून उतरुन दोघे कुठे गेले याची माहिती घेण्यात यावी, असे आरोपी दत्ता गाडेच्या वकीलांनी सांगितले. पोलिसांनी आरोपीच्या भावला देखील सोबत ठेवले आहे, कारण त्याचा भाव देखील त्याचासारखाच दिसतो. तसेच या प्रकरणात सुरूवातीला आरोपी दत्ता गाडे समजून आरोपीच्या भावालाचा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आता या प्रकऱणात आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
पोलिसांनी ठोकल्या बेड्या
26 फेब्रुवारी रोजी पुण्याच्या स्वारगेट बस डेपोमध्ये तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली होती. तब्बल ७५ तासांनी पोलिसांनी शोधमोहिम राबवत आरोपी दत्तात्रय गाडेला शिरुर तालुक्यातील गुणाट गावातून स्थानकांच्या मदतीने अटक केली.




