Pune District : तीन प्रभागांत समस्यांचा डोंगर; मंचर नगरपंचायत निवडणुकीत ठरणार कळीचा मुद्दा?

मंचर : येथील नव्याने स्थापन झालेल्या मंचर नगरपंचायतीच्या एकूण 17 प्रभागांपैकी किमान तीन प्रभागांमध्ये नागरी समस्या कायम असून त्या आगामी निवडणुकीत ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. पथदिवे नसल्याने रात्री अंधाराचे साम्राज्य, ड्रेनेज व्यवस्थेचा अभाव, आणि रस्त्यांची दुरवस्था या प्रमुख समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. अनेक ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचून रस्त्यांवर चिखलाचे दलदलीचे स्वरूप निर्माण होते.
नागरी समस्या प्रलंबित असून नागरिकांनी वारंवार मागण्या करूनही ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्याने आता या प्रश्नांवर उमेदवार काय भूमिका घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. मतदारांचा भर आता आश्वासनांवर नसून प्रत्यक्ष काम करणार्या उमेदवारांवर राहणार असल्याचे स्थानिकांनी सांगितले. रस्ते, पथदिवे आणि ड्रेनेज यांसारख्या मूलभूत सुविधा नसल्याने शहराच्या विकासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत केवळ राजकारण नव्हे, तर नागरी सुविधा आणि विकास हाच मुख्य मुद्दा ठरणार आहे. मंचर नगरपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाली असून, स्थानिक राजकारणात चुरस वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रभागनिहाय आरक्षण :
प्रभागनिहाय आरक्षण आणि मतदारसंख्या
प्रभाग क्रमांक–आरक्षण प्रकार–एकूण मतदार–पुरुष मतदार–महिला मतदार–प्रभागाची व्याप्ती
1–सर्वसाधारण (महिला)–1071–535–536–उत्तर: सुलतानपुर रोड (पाण्याची टाकी)
पूर्व: नवीन पुणे-नाशिक हायवे
दक्षिण: मारुती मंदिर उभी बाजारपेठ
पश्चिम: चावडी चौक (अवलिया दर्गा)
2–सर्वसाधारण (महिला)–1104–563–541–उत्तर: बुवासाहेब मंदिर (बायपास)
पूर्व: नवीन पुणे-नाशिक हायवे (जीवन हॉटेल समोरील भाग)
दक्षिण: संत नरहरी महाराज मंदिर
पश्चिम: छत्रपती संभाजी महाराज चौक
3–अनुसूचित जमाती–701–352–349–उत्तर: जीवन हॉटेल
पूर्व: हिलसिटी
दक्षिण: वृंदावन सोसायटी पश्चिम भाग
पश्चिम: वामनकाका बेडे घर
छायाचित्र : मंचर नगरपंचायत





