तारळी धरणाच्या पाण्यात अल्पवयीन मुलगा बुडाला

उंब्रज – तारळी धरणाच्या पूर्वेला धरणातून पाणी सोडण्यासाठी असलेल्या पाटाशेजारी साठलेल्या खोल डबक्‍यात दोन अल्पवयीन भाऊ पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना धाकट्याला वाचावण्याच्या नादात मोठ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. नवनाथ अनिल मोरे (वय 14, रा. मुरूड, ता. पाटण) असे मयत मुलाचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल मोरे हे मुरूड परिसरात भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करतात. मंगळवार, दि.21 रोजी ते कुटुंबीयासह परगावी गेले होते. त्यांची तीन अल्पवयीन मुले शेळ्या चारण्यासाठी तारळी धरण परिसरात गेले होते. त्यातील दोघेजण तारळी धरणाच्या पुर्वेला धरणातून पाणी सोडण्यासाठी पाटाशेजारी असणाऱ्या पाण्याच्या खोल व रूंद पात्रात गेले होते. दररोज अनेक मुले त्याठिकाणी पोहण्यासाठी जात असतात. पण त्यावेळी त्या परिसरात त्या तिघांव्यतिरीक्त कोणीही पोहण्यासाठी नव्हते. पोहत असताना लहान भाऊ असताना बुडू लागला.

यावेळी त्याच्याबरोबर पोहत असणाऱ्या नवनाथ याने त्याला ढकलत बाहेर आणले. लहान भाऊ पोहत बाहेर आला. पण नवनाथ याला मध्येच दम लागला व तो बुडू लागला. त्यावेळी पात्राबाहेर असणाऱ्या दोघांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. पण जवळपास कोणी नसल्याने बुडणाऱ्या नवनाथला वेळेत मदत मिळाली नाही व तो पाण्यात बुडाला. दरम्यानच्या काळात काही प्रवाशी तेथून जाताना त्यांनी मुलांचा आरडाओरडा ऐकला. जवळ जाऊन बघितले असता त्यांना मुलगा बुडाल्याचे समजले. त्यांनी तोंडोशी व मुरूड येथे कल्पना दिली. यावेळी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत नवनाथ याला बाहेर काढले. पण बाहेर काढेपर्यंत त्याची प्राणज्योत मावळली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here