बारामती – दारूच्या नशेत असलेल्या दोन मित्रांनी तिसऱ्या मित्राचा निर्घृण खून केल्याची घटना मोरगाव रोड येथे घडली. नशेतून भानावर आल्यावर दोन्ही आरोपींनी थेट पोलीस स्टेशन गाठले. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील जुन्या मोरगाव रोड येथे तीन मित्र दारू पीत बसले होते. किरकोळ कारणावरून त्यांच्यात शिवीगाळ झाली. त्यानंतर त्याचे रूपांतर भांडणात झाले. अविनाश उर्फ माऊली धनंजय लोंढे याने शिवागाळ केल्याने दोन्ही मित्रांनी त्याला जीवानिशी मारलं. इतका वाढला की, संतप्त झालेल्या दोघांनी बाजूला असलेला एक दगड उचलला आणि त्यांनी तिसऱ्या मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याला ठेचलं. त्यांचा मित्र मरेपर्यंत दोघांनी त्याला दगडाने मारहाण केली आणि त्याचा डोक्याचा चेंदामेंदा केला. या घटनेनंतर भानावर आलेले दोन्ही आरोपी थेट पोलीस ठाण्यात हजर झाले आणि त्यांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशीरा घडलेल्या या घटनेत अविनाश उर्फ माऊली धनंजय लोंढे (वय 20, बारामती) याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी समीर इक्बाल शेख आणि प्रथमेश राजेंद्र दळवी या दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, अविनाशचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच दोन्ही आरोपींनी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होऊन आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. दोन मित्रांनी दारुच्या नशेत केलेली हे क्रूर कृत्य शहरात चर्चेचा विषय ठरलं आहे. हेही वाचा: “तीन वर्षांपासून राहुल गांधींना भेटलो नाही…” ; सोनिया गांधींना पत्र लिहिल्यानंतर मुकीम यांची हकालपट्टी