हिंदू-मुस्लिम ऐक्याचे जिवंत उदाहरण ! अजान सुरू झाली अन् गणपती विसर्जन मिरवणूक थांबली

Updated On:
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे जिवंत उदाहरण ! अजान सुरू झाली अन् गणपती विसर्जन मिरवणूक थांबली

नाशिक – नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणूकीदरम्यान हिंदू मुस्लिम एकोप्याचे उदाहरण पाहायला मिळाले आहे. विसर्जन मिरवणूकीदरम्यान अजान सुरु होताच मिरवणूक थांबविण्यात आली आणि ढोल वादनही थांबविण्यात आले.

देशभरात आज जल्लोषात भावपूर्ण वातावरणात गणेश विसर्जन सुरु आहे. अशावेळी जुन्या नाशिक येथील गणेश विसर्जन मिरवणूक दुध बाजार पोलीस चौकीजवळ आली असता त्या ठिकाणी असलेल्या मशीदीमध्ये सायंकाळी पाच वाजता अजान सुरु झाली. त्यावेळी मिरवणूक थांबवून ढोल पथकाचा आवाजही बंद करण्यात आला. यावेळी हिंदू-मुस्लिम एकोप्याचे जीवंत उदाहरण पाहायलया मिळाले. विसर्जन मिरवणूकीतून अत्यंत सकारात्मक संदेश देशाला मिळाला आहे.

दरम्यान, दोन वर्षांच्या खंडानंतर यावर्षी देशभरात जल्लोषात गणेश उत्सव साजरा करण्यात आला. गणेश चतुर्थी दिवशी प्राणप्रतिष्ठा झालेल्या गणपतीला आज अनंत चतुर्दशी दिवशी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात येत आहे. देशात अनेकदा काही लोक हिंदू- मुस्लीम धर्मियांमध्ये द्वेषाचे वातावरण पसरवत असतात मात्र, वेळोवेळी देशातील नागरिक हे हिंदू-मुस्लीम भाई-भाई असल्याचे निदर्शनात आणून देतात. हा संदेश देशासाठीच नव्हेतर जगासाठीही महत्वपूर्ण मानला जात आहे.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Salunkhe : संत निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखेंवर गंभीर गुन्हा; महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू

2026-10-03 18:09:53

Rahul Salunkhe : संत निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखेंवर गंभीर गुन्हा; महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू

Thergaon Ghat : पालिकेची ‘जोरदार’ तयारी कागदावरच; थेरगाव विसर्जन घाटावर हौद कोरडा!

2026-09-27 10:48:39

Thergaon Ghat : पालिकेची ‘जोरदार’ तयारी कागदावरच; थेरगाव विसर्जन घाटावर हौद कोरडा!

Girish Mahajan: गणेश विसर्जन मिरवणुकीत पालकमंत्री गिरीश महाजन यांचा ढोल वादनाचा ठेका

2026-09-25 13:48:18

Girish Mahajan: गणेश विसर्जन मिरवणुकीत पालकमंत्री गिरीश महाजन यांचा ढोल वादनाचा ठेका

Ganeshotsav 2026 : सातव्या दिवशी १,३०० हून अधिक मूर्तींचे विसर्जन

2026-09-20 21:44:47

Ganeshotsav 2026 : सातव्या दिवशी १,३०० हून अधिक मूर्तींचे विसर्जन

Pune News : आसामच्या युवक-युवतींच्या हस्ते पुण्याच्या महापौर निवासमधील श्रींची आरती संपन्न

2026-09-19 17:12:13

Pune News : आसामच्या युवक-युवतींच्या हस्ते पुण्याच्या महापौर निवासमधील श्रींची आरती संपन्न