Nana Patekar : मराठी आणि हिंदी सिनेमासृष्टीतील अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या विविधअंगी अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी आजवर अनेक सिनेमे केले, त्यांच्या सिनेमांवर लोकांनी भरभरून प्रेम केलं, अजूनही करत आहेत. नाना पाटेकरांनी क्रांतीवर सिनेमात साकारलेली भूमिका आजही डोळ्यांसमोर चटकन उभी राहते. याशिवाय त्यांचा अभिनेता अनिल कपूरसोबत केलेला परींदा सिनेमा. त्यातलं त्यांनी अण्णाची केलेली भूमिका अंगावर काटा आणणारी आहे. याच सिनेमाच्या शुटिंगचा सेटवरचा किस्सा नानांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे. त्या सिनेमाचं नाव होतं परिंदा. ९० च्या दशकात या सिनेमाने मोठं नावलौकिक मिळवलं. सिनेमातील सगळ्या पात्रांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. या सिनेमात अभिनेते नाना पाटेकरांनी अण्णा नावाचं पात्र साकारलं होतं. या सिनेमातील एक सीन शूट करताना डिजिटल आग लावण्याऐवजी खरी खुरी आग सेटवर लावण्यात आली होती. यामुळे नाना पाटेकरांना हा सीन शुट करताना प्रचंड मेहनत घ्यावी लागली. पण सीन शुट करताना थोड इकडं तिकडं झालं अन् नाना पाटेकर त्या आगीत खरेखुरे होरपळून निघाले होते. याचा प्रचंड त्रास त्यांना सहन करावा लागला होता. कित्येक महिने ते अंथरुणाला खेळून होते. याबाबत त्यांनी स्वतः सांगितंल आहे. नेमकं काय घडलं होतं? परिंदामधील ज्या सीनमध्ये मी आगीत होरपळून निघतो.. त्यात माझ्या संपूर्ण शरीराला खरोखरंच आग लागलेली. मला दोन महिने रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं… माझी चामडीही जळालेली… सर्व काही जळालं… दाढी, मिशा, पापण्या, सर्व काही जळालं… मी सहा महिने असाच होतो… पहिल्या टेकमध्ये आम्ही तीन बादल्या ओतल्या, दुसऱ्या टेकमध्ये आम्ही 14 बादल्या ओतल्या… आग खूप मोठी होती… तो एक अपघात होता… हेही वाचा : “असीम मुनीरची अणुहल्ल्याची धमकी ही लादेनची भाषा” ; माजी अमेरिकन अधिकारी संतापले