Bhaskar Jadhav : विरोधी पक्षनेत्यासाठी अध्यक्षांना पत्र द्यावेच लागते – भास्कर जाधव

नागपूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी अर्ज मागणीपत्र हे द्यावेच लागते, ते विधानसभा अध्यक्षांना दिले की मग त्यावर ते काय निर्णय घेतात यावर भाष्य करणे उचित ठरेल असे म्हणत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेते पदावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दरम्यान राज्याच्या विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाबाबत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये वेगवेगळा मत प्रवाह दिसून येत आहे. यामध्ये काँग्रेस अन् राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेतेपद मागण्याची गरज नसल्याची भूमिका घेण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून अजित पवार, विजय वडेट्टीवारांच्या पक्षाने मागणी केल्यावरच त्यांना पद मिळाली होती असे सांगण्यात येत आहे.
भास्कर जाधव म्हणाले की, विरोधी पक्षनेतेपदासाठी मागणी करावी लागते. आमचे सरकार पडले तेव्हा अजित पवार यांनी तशी मागणी केली होती जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून तशी मागणी केली होती. अन् त्यांना राज्याचे विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले. अजित पवार जेव्हा सत्तेत गेले तेव्हा विजस वडेट्टीवारांच्या पक्षाने मागणी केली अन् मग त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले.





