प्रभात वृत्तसेवा कामशेत – मावळ तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या भाजे धबधब्यावर सध्या पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्याने हवामान आल्हाददायक झाले असून, धबधब्याचे सौंदर्यअनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे भेट देत आहेत.सध्या धबधबा ओसंडून वाहत असल्यामुळे परिसरात उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. हा धबधबा निसर्गप्रेमींना, फोटोशूट करणाऱ्यांना आणि तरुणाईला विशेष आकर्षित करत आहे. स्थानिक प्रशासनाकडून देखील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना राबवण्यात येत आहेत. पर्यटकांसाठी हा धबधबा केवळ सौंदर्यदृष्ट्या महत्त्वाचा नसून, ऐतिहासिक लेण्यांच्या सान्निध्यात असल्यामुळे तेथील वास्तुशिल्प आणि निसर्ग यांचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी मिळते. त्यामुळे मावळ तालुक्याचे हे ठिकाण सध्या पर्यटन नकाशावर पुन्हा एकदा झळकत आहे.