प्रभात वृत्तसेवा वाल्हे – श्रीक्षेत्र वाल्हे (ता. पुरंदर) हे पुणे-पंढरपुर महामार्गावर तसेच पुणे-मिरज रेल्वेमार्गावर युगानुयुगे आपले अस्तित्व, दोन ओढ्याच्या मध्ये असलेले एक अतिप्राचीन गाव. गाव जेवढं अतिप्राचीन तेवढाच, गावचा इतिहासही प्राचीन व मोठा आहे. श्री भैरवनाथ गावचे जागृत ग्रामदैवत. गावच्या पूर्वेला सातरांजण पर्वत, त्याच्या बाजुलाच शिवलिंगासारखा आकार असलेल्या टेकडीवरील महादेव मंदिर व भवानीमाता डोंगर. यापैकी महादेव डोंगर वैशिष्टपूर्ण असा आहे. त्याचे वैशिष्टे असे की, दुरून डोंगराकडे पाहताना कोणत्याही बाजूने म्हणजे दक्षिण किंवा उत्तरेकडून पाहताना त्याचा आकार हा शिवलिंगासारखाच दिसतो. अगदी मध्ये भागावरच शिव मंदिर दिसते. त्यांच्या बाजूंचा भवानी माता डोंगर. वाल्हेच्या पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर असलेल्या वाल्हेजवळच पूर्वेच्या दिशेला दख्खनच्या पठारावर असलेले एक सुंदर असे शंभू महादेवाचे मंदिर ही एक वास्तू पाहावयास मिळते. पठाराला महादेवाचा डोंगर असे म्हटले जाते. गावात प्रवेश करण्यापूर्वी दूरवर अत्यूच्च ठिकाणी असलेले मंदिर लक्ष वेधून घेते. ते डोंगराच्या वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक आकारामुळे हुबेहूब महादेवाच्या पिंडीचा महाकाय आकार असलेल्या पठारावर हे मंदिर म्हणजे पिंडीच्या मधोमध असणाऱ्या शाळुंक्याप्रमाणे दिसते.पठरावर अलीकडे असलेल्या भवानी मातेच्या मंदिरापर्यंत वाहनातून जाण्याचा कच्चा रस्ता झाला आहे. भवानीमातेच्या पठारावर एका बाजूला वाल्या कोळ्याचे सात रांजण तर दुसऱ्या बाजूला महादेवाचा डोंगर हे पौराणिक महत्त्व असलेल्या ठिकाणाकडे जाणाऱ्या दोन पायवाटा फुटतात. पायवाटेने पठावर काही अंतर चालून गेल्यानंतर उजव्या बाजूला उंच असलेले दुसरे मुख्य पठार म्हणजे महादेवाच्या डोंगराची चढण लागते. काहीशी अवघड चढण पार केल्यानंतर पिंडीचा आकार प्राप्त झालेल्या पठारावर पोहोचतो.मंदिराकडे जाताना पठाराचा आकार निमुळता होत गेला आहे. जेथे दोन्ही कडा मिळतात नेमके, त्याच ठिकाणी अगदी जेमतेम असलेल्या भूभागावर हे घडीव दगडातील हे मंदिर बांधलेले आहे.मंदिरात प्रवेश करण्यास असलेल्या प्रवेशद्वारही अगदी छोटे खाणी असेच आहे. मंदिरात अखंड पाषाणात कोरलेले शिवलिंग आहे. मंदिराभोवती फेरे मारायची झाल्यास एकाच व्यक्ती फिरू शकते एवढीच मोकळी जागा पहावयास मिळते. श्रावणात भाविक महादेवचरणी नतमस्तक.. कधी प्राचीन काळी झालेल्या भूगर्दी हालचालीमुळे सभोवताली बाजूची झुला निर्माण झालेल्या तीव्र उतारामुळे मंदिराभोवती एकच व्यक्ती फिरू शकते. एवढी जागा पहावयास मिळते. पावसाळ्यात हे पठार हिरवेगार वनराईने नटलेले असते. पठाराच्या रांगेत अगदी उंच असलेल्या पठारावरून फिरत असताना सृष्टीचा अदभूत नजरा अनुभवण्यासाठी पर्यटकांची वर्दळ पहावयास मिळते. श्रावण महिन्यांमध्ये सोमवारी आवर्जून भाविक भक्त महादेवाचे दर्शन घेतात.