एक हिरो आणि सहा अभिनेत्री! स्वप्नील जोशीचा ‘बाई गं’ ‘या’ दिवशी होणार रिलीज

Swapnil Joshi New Film| ‘बाईपण भारी देवा’ आणि ‘नाच गं घुमा’ या मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. खासकरून महिलांमध्ये या दोन्ही चित्रपटांची क्रेझ पाहायला मिळाली. या चित्रपटानंतर स्वप्नील जोशीच्या ‘बाई गं’ या चित्रपटाची देखील प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. ‘नाच गं घुमा’ चित्रपटाच्या यशानंतर स्वप्नील जोशी ‘बाई गं’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सहा अभिनेत्री झळकणार आहेत.
स्वप्नील जोशीसोबत सुकन्या मोने, नेहा खान, अदिती सारंगधर, नम्रता गायकवाड, प्रार्थना बेहरे आणि दीप्ती देवीही चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत. त्यांच्यासोबतच अभिनेता सागर कारंडेही दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे.
View this post on Instagram
यात स्वप्नील नवरदेवाच्या वेशात तर या सर्व अभिनेत्री नवरीच्या वेशात दिसत आहेत. या सगळ्या अभिनेत्री स्वप्नीलच्या बायकोची भूमिका साकारणार आहेत. यापैकी कोणती अभिनेत्री त्याची पत्नी होणार हे या चित्रपटातून स्पष्ट होणार आहे. स्वप्नील जोशी यात धनुष नावाची भूमिका साकारत आहे. Swapnil Joshi New Film|
पांडुरंग कृष्णा जाधव यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. यातीलगाणी जय अत्रे, मंदार चोळकर आणि समीर सामंत यांनी लिहीली आहेत. वरुण लिखते यांनी या गाण्यांना संगीतबद्ध केले आहे. तर डॉ. आशिष अग्रवाल, नीतीन प्रकाश वैद्य आणि ओ. एम. जी मीडिया चेंबर्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. १२ जुलै २०२४ ला हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. स्वप्नील जोशीचा हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवण्यात यशस्वी ठरणार का? हे पहावे लागणार आहे.





