Pimpri : पूरग्रस्ताना एक हात मदतीचा..!

पिंपळे गुरव : राज्यातील अनेक जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाने झोडपल्याने पुराने मोठे नुकसान झाले आहे. शशिकांत आप्पा कदम मित्र परिवार आणि कदम परिवार यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत पाठविण्यात आली. चिंचवड विधानसभा आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी नगरसेवक शशिकांत आप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडयातील भूम तालुक्यातील जयवंतनगर, राळेसांगवी, बेदरवाडी, पाथरूड, जांब, पाटसंगावी, आंबी, आंतरगाव, चिंचपूर ढगे, तसेच परांडा तालुक्यातील लाखी बुकी, जाके पिंपरी या गावात जीवनावश्यक वस्तूंच्या तब्बल ५०० किटचे वाटप करण्यात आले.
आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते २५ जीवनावश्यक वस्तू असलेल्या किट माजी आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे समर्थकचंद्रकांत सरडे, युवा उद्योजक आणि जांब भुमचे सरपंच समाधान भोरे, डॉ. रविंद्र अनभुले, दिपक गटकळ, शरद जाधव, अमर शिंदे, हनुमंत हुके, तेजस चौधरी यांचेकडे सुपूर्त करण्यात आले.
“आपत्तीग्रस्त भागाची पाहणी करताना, आपत्तीग्रस्तांशी संवाद साधताना आपण त्यांना काहीतरी मदतीचा हात दिला पाहिजे अशी आमची नेहमीच भूमिका असते. त्याप्रमाणे या भागातही आम्ही आपत्तीग्रस्तांच्या भेटीप्रसंगी जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करत असून अजून जेवढे शक्य आहे तेवढी मदत करणार आहोत.
शशिकांत (आप्पा) कदम, माजी नगरसेवक, पिं. चिं. मनपा.





