पुणे: जागतिक गेमिंग अनुभव व शिक्षण केंद्र स्थापन होणार

पुणे – विश्वकर्मा इन्स्टिट्यूट आणि विश्वकर्मा युनिव्हर्सिटी (व्हीआयव्हीयु) ने झेन्सर टेक्नॉलॉजीजसोबत भागीदारी जाहीर केली. या भागीदारीच्या माध्यमातून गेमिंग एक्सपीरियन्स लर्निंग (जिएक्सएल) नावाचे एक नवीन केंद्र स्थापन केले जाईल. ही नाविन्यपूर्ण भागीदारी व्हीआयव्हीयु आणि झेन्सरला जागतिक गेम डिझाइन आणि विकास क्षेत्रात नेतृत्व निर्माण करण्यासाठी मदत करेल.
गेम विकास उद्योगात क्रांती घडवणे, हे जिएक्सएल केंद्राचे उद्दिष्ट आहे. झपाट्याने विकसित होणाऱ्या उद्योगात यशस्वी होण्यासाठी कुशल गेम डेव्हलपर्सची निर्मिती करणे, उद्योग व्यावसायिकांसाठी उच्च दर्जाचे प्रशिक्षण आणि विकास कार्यक्रम प्रदान करणे हा याचा उद्देश आहे.
गेमिंग अनुभव आणि शिक्षणासाठी एक अत्याधुनिक केंद्र स्थापन करण्याबरोबरच विशिष्ट प्रशिक्षण आणि संसाधनांद्वारे व्यक्तींना त्यांच्या करिअर आणि शैक्षणिक संधी वाढविण्यासाठी सक्षम करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. मार्क विलेट, हेड ऑफ गेम्स पोर्टफोलिओ स्टुडिओ आणि विवेक कुलकर्णी यांच्या नेतृत्वात झेन्सरच्या प्रतिनिधीनी विश्वकर्मा इन्स्टिट्यूट आणि विश्वकर्मा गुनिव्हर्सिटीच्या प्रमुखांशी चर्चा केली. ज्यात व्हीयूचे कुलपती प्रो. (डॉ.) सिद्धार्थ जाबडे, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (व्हीव्हीआयटी) चे संचालक डॉ. विवेक देशपांडे आणि विश्वकर्मा इन्स्टिट्यूटचे कॉर्पो रेट रिलेशन्सचे संचालक डॉ. अतुल पी. कुलकर्णी यांचा समावेश होता.
आमच्या प्रगतीमध्ये सहभागी व्हा आणि गेमिंगच्या जगात नवी परिभाषा तयार करा, नवीनतम अपडेटसाठी आणि प्रगतीसाठी आमच्या सोशल मीडिया चॅनेल्सला नक्की फॉलो करा, असे आवाहन विश्वकर्मा इन्स्टिट्यूट आणि विश्वकर्मा युनिव्हर्सिटीद्वारे विद्यार्थीवर्गाला करण्यात आले आहे.





