बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या राय बच्चन ओळखली जाते. आजही ती लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करते. अनेक तरुणी ऐश्वर्याला फॉलो करताना दिसतात. अशातच सोशल मीडियावर ऐश्वर्यासारखी दिसणारी एक तरुणी सध्या चर्चेत आहे. तिने ऐश्वर्याच्या चित्रपटातील एक सीन रिक्रिएट केला आहे. ऐश्वर्यासारख्या दिसणाऱ्या तरुणीला पाहून सर्वचजण आश्चर्यचकित झाले आहेत. तिने ऐश्वर्याचा दाक्षिणात्य चित्रपट Kandukondain Kandukondainमधील एक सीन रिक्रिएट केला आहे. हा चित्रपट त्यावेळी हिट ठरला होता. तिच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. एका यूजरने तर ही ऐश्वर्याची कॉपी आहे असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ती बॉलिवूड अभिनेत्री दीपिका आणि ऐश्वर्याचे कॉम्बिनेशन असल्याचे म्हटले आहे. तर अनेकांनी तिला चित्रपटात काम करण्याची संधी दिली आहे. तिचे हे व्हिडीओ पाहता तिचे हाव-भाव देखील ऐश्वर्याशी मिळते जुळते असल्याचे दिसत आहे. या तरुणीचा आणखी एक व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ती एक गाणे गाताना दिसत आहे. तिचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.