अकोले, (प्रतिनिधी – शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा गुरुवार दि. १० आॅक्टोबर रोजी सकाळी १ १ वाजता महाराजा लॅान्स, अकोले येथे शिवसेना राज्याचे सचिव भाऊसाहेब चाैधरी, मा.खा.सदाशिव लोखंडे, शिर्डी लोकसभेचे पक्षनिरीक्षक राजेंद्र चाैधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. अकोले तालुका शिवसेनेच्यावतीने प्रसिद्धीपत्रक देण्यात आले. यानुसार अकोले शहरातील महाराजा लॅान्स येथे १० आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शिवसेना पदाधिकारी मेळावा होत आहे. या मेळाव्यास शिवसेना राज्याचे सचिव भाऊसाहेब चाैधरी, मा.खा.सदाशिव लोखंडे, शिर्डी लोकसभेचे पक्षनिरीक्षक राजेंद्र चाैधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहे. उत्तर अहिल्यानगर जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, नितीन औताडे, उत्तर अहिल्यानगर संपर्क प्रमुख बाजीराव दराडे, बाळासाहेब पवार, जिल्हा संघटक विठ्ठलराव घोरपडे, विजय काळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुनिता शेळके, संपर्क प्रमुख महिला आघाडी सुरेखा गव्हाणे आदी उपस्थित राहणार आहे. मान्यवर मंडळी सर्व शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहे.