आळंदी परिसरात म्हशी चोरांची टोळी सक्रीय
Updated On:

आळंदी – आळंदी परिसरातून गेल्या 15 दिवसांत चार म्हशींची चोरी करण्यात आल्याने म्हशींची चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची भिती व्यक्त होत आहे. दरम्यान, या चोरींबाबत आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
इंद्रायणी नदीकाठी राहणाऱ्या फिर्यादी दत्तात्रय काटे यांच्या दोन, केळगाव येथील नंदकुमार मुंगसे यांच्या गोठ्यातून दोन म्हशींची चोरी करण्यात आली आहे. दरम्यान, चोरी करणारे तीन जण असून ते पाळत ठेवून चोरी करीत आहेत. यातील एकाने लाल जर्किंन घातले असून ते विनानंबरच्या पिकअपमधून म्हशींची चोरी करीत असल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.

