बाल्टिमोर, (अमेरिका) – पश्चिम बाल्टिमोर येथे रस्त्यावरील एका गर्दीवर बंदुकधाऱ्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात एक जण ठार तर आठ जण जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे. या भागातील एका रस्त्यावर मेजवानीसाठी दोन विरूद्ध बाजुला दोन जमाव जमले होते. त्यातील एका जमावावर या इसमाने गोळीबार सुरू केला. दुसऱ्या ठिकाणी दुसराही हल्लेखोर उपस्थित असावा असा कयास आहे पण तो नंतर पळून गेला. त्यामुळे त्या ठिकाणचे लोक बचावले.
पहिल्या ठिकाणचा हल्लेखोरही नंतर पळून गेल्याचे सांगण्यात येते. या गोळीबारात एक इसम ठार झाला असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाहीं. हल्लेखोरांच्या संबंधात कोणाला काही माहिती असल्यास ती त्यांनी तपास अधिकाऱ्यांना द्यावी असे आवाहन तपास यंत्रणांद्वारे करण्यात आले आहे. या हल्ल्याचे हेतुही समजलेला नाही. ज्यांच्यावर गोळीबार झाला त्यांची नावेही पोलिसांनी जाहीर केलेली नाहीत