Actor Suyash Tilak| अभिनेता सुयश टिळक ‘का रे दुरावा’ या मालिकेतून घराघरात पोहचला. यातील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्याने मालिकांसह, नाटक आणि चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. सोशल मीडियावर देखील तो सक्रिय असल्याचे पहायला मिळते. नुकतेच सुयशने इन्स्टावर चाहत्यांबरोबर askme सेशन घेतले होते. यादरम्यान एका चाहत्याने सुयशला भारतीय क्रिकेटर रोहित शर्माच्या बायोपिकमध्ये काम करण्याचा सल्ला दिला आहे. स्टार फलंदाज असलेल्या रोहितच्या आणि संपूर्ण भारतीय संघाच्या मेहनतीमुळे यंदा टी २० विश्वचषक भारतीय क्रिकेट टीमने जिंकला आहे. त्यामुळं सध्या रोहित शर्माचे चाहते त्याचा बायोपिक रुपेरी पडद्यावर पाहायला उत्सुक आहेत. त्यादरम्यान एका चाहत्याने “जर रोहित शर्मावर बायोपिक बनवला तर तुम्ही ऑडिशन द्या… तुम्ही रोहितसारखा दिसता” अशी विनंती सुयशला केली. त्यावर सुयशने ओके नक्की असा रिप्लाय दिला. तर त्याने या स्टोरीमध्ये रोहित शर्मालाही टॅग केलं आहे. अलिकडेच सुयशने ‘अबोली’ मालिकेत काम केलं होतं. सध्या त्याची सन मराठीवर ‘आदिशक्ती’ ही मालिका सुरु आहे. तर ‘बापमाणूस’, ‘पुढचं पाऊल’, ‘दुर्वा’, ‘जाऊ नको दूर बाबा’, ‘सख्या रे’ या मालिकांमध्येही त्याने काम केलं आहे. याशिवाय ‘कॉफी आणि बरंच काही’ या सिनेमातही तो दिसला होता. Actor Suyash Tilak| हेही वाचा : ’20 वर्षा’च्या मुलाने AR-15 रायफल आणली; ‘ट्रम्प’ यांना 120 मीटर अंतरावरून गोळी झाडली